Police Bharti Feb 2024 | महाराष्ट्र पोलीस विभागा आंतर्गत राज्यात भरती

Police Bharti Feb 2024: 16 फेब्रुवारी 2024 या तारखेपर्यंत खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. व अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पर्याय असेल. खालील प्रमाणे दिलेला हा लेख काळजीपूर्वक वाचावा आणि पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.

एकूण पदाची भरती:-

  • 28 जागा.
  • पदा चे नाव-
  1. विधी निदेशक.

भरती चा प्रकार:-

  • कंत्राटी नोकरी.

Police Bharti Feb 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता:-

  1. उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून पदवी प्राप्त असावी.
  2. विधी निदेशक पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान पाच वर्षाचा अनुभव असावा.
  3. उमेदवारास संबंधित पदाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे परिपूर्ण ज्ञान असेल आणि तो संबंधित कायद्याचे प्रशिक्षण देण्यास सक्षम असावा.
  4. उमेदवारास मराठी, हिंदी, व इंग्रजी या भाषेचे ज्ञान असावेत.

वयोमर्यादा-

  • 18 ते 60 वर्षापर्यंत.

मासिक वेतन-

  • 20,000 + 3,000 प्रवास खर्च.

Police Bharti Feb 2024 Important links

✅अधिकृत जाहिरात इथे क्लिक करा.
💻ऑफिशियल वेबसाईट इथे क्लिक करा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता / ठिकाण-

  • पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई- 400001.

नोकरीचे ठिकाण-

  • महाराष्ट्र.

निवड प्रक्रिया-

  • तोंडी परीक्षा व लेखी परीक्षा.

अर्ज फी-

  • फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख-

  • 16 फेब्रुवारी 2024

Police Bharti Feb 2024 IMP Details:

उमेदवार शासकीय सेवेत असताना प्रात्यक्षपणे विधिविषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी प्रशासकीय व सेवा विषयक कायदेविषयक सखोल ज्ञान असेल त्याप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवी ग्राह्य धरण्यात येईल.

विधी निर्देशक या पदाच्या जबाबदाऱ्या स्पष्टीकरणासहित-

  1. प्रशिक्षण केंद्रावरच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देणे.
  2. पोलीस प्रशिक्षणा विषयक सर्व बाबी तथा वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे.
  3. उत्तर पत्रिका तपासणे.
  4. परीक्षेचा निकाल तयार करणे.
  5. पोलीस प्रशिक्षण शाळेत वेळोवेळी होणाऱ्या सर्व परीक्षा तथा लेखी परीक्षा यासाठी प्रश्नपत्रिका संच तयार करणे व उमेदवारांची परीक्षा घेणे.
  6. पोलीस प्रशिक्षण शाळा यांना मदत करणे अशा महत्वपूर्ण कर्तव्य सोपवले जातील.

विधी निदेशक या पदाकरिता काही महत्त्वाच्या नियम / अटी-

  1. उमेदवाराची निवड करताना प्रथम 50 गुणाची लेखी परीक्षा व 25 गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल. लेखी व तोंडी परीक्षेत प्रथम गुण एकत्रित करून एकूण गुण क्रमांकानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने नेमणुकी संबंधी कारवाही करण्यात येईल. तसेच, नियुक्ती देण्यासाठी कमीत कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  2. सादर नेमणुका या करार पद्धतीने प्रथम 11 महिन्यासाठी करण्यात येतील. अकरा महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनेम याची मुदत वेळोवेळी वाढविण्यात येईल. अशाप्रकारे जास्तीत जास्त तीन वेळा नियुक्ती करण्यात येईल.
  3. सादर पदाची नेमणूक पूर्णता कंत्राटी पद्धतीने असेल. अधिकारी / कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.
  4. उमेदवाराची निवड झाल्यानंतर अकरा महिन्याच्या कराराच्या कालावधीत वकिली व्यवसायाशी संबंधित कोणताही प्रकारचे खाजगी काम नियुक्ती प्राधिकरणाची लेखी व परवानगीशिवाय करू शकणार नाहीत.
  5. जर नियुक्ती प्राधिकरणाचे सादर बाबतीची परवानगी नकारले असेल आणि परवानगी नकारल्यावरही उमेदवाराने खाजगी व्यवसाय किंवा काम सुरू ठेवला असल्यास तसे शासनाच्या कामात अधिक नुकसान होत असेल तर अशा उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  6. लेखी परीक्षेच्या दिनांक व लेखी परीक्षेचे केंद्र ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
  7. लेखी परीक्षा झाल्यानंतर उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल मुलाखतीची दिनांक व मुलाखती त ज्या ठिकाणी होणार आहेत त्याबाबतचे ठिकाण उमेदवारांना ईमेलद्वारे कळविण्यात येईल.
  8. नियुक्ती केलेल्या उमेदवाराला दिनांक 15-9-2006 च्या शासन नियमांसोबतच्या करारनामा करणे अनिवार्य राहील.
  9. कंत्राटीपद्धतीने नेमणूक करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकत्रित वेतन आणि दूरध्वनी व प्रवास खर्च व्यक्ती इतर कोणतेही भत्ते दिले जाणार नाहीत.
  10. अर्जासोबत पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी केलेले दोन रंगीत फोटो जोडावेत.
  11. नियुक्ती अधिकाऱ्यांनी निवड केलेल्या उमेदवारांना विधीनिदेशक पदावर नियुक्तीच्या ठिकाणी नियुक्ती आदेशाच्या दिनांकानुसार 30 दिवसाच्या आत नियुक्ती स्वीकारणे अनिवार्य आहे. उमेदवाराने त्याची विधी निदेशक पदावरील नियुक्ती स्वीकारली नाही, तर त्याची नियुक्ती रद्द करण्यात येईल, वेटिंग लिस्ट यादीवरील अन्य उमेदवाराची निवड करण्यात येईल, याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिक माहिती करिता लिंक द्वारे दिले गेलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment